आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आजही जवळपास ७० टक्के लोक शेती किंवा शेती पूरक व्यवसायावर अवलंबून आहेत. शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. आपली शेती ही पावसावर अवलंबून आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, खराब हवामान, विविध रोगांचा फैलाव, प्राणी व पक्षी यांचा उपद्रव, उत्पन्नाची अनियमितता या व इतर अनेक कारणांमुळे शेतकरी नेहमीच चिंतेत असतो.
कधीकधी त्याने पिकवलेल्या शेतमालाला दोन पैसे देखील भाव मिळत नाही. उत्पन्न तर सोडाच पण गुंतवणूक केलेले पैसे सुद्धा परत मिळत नाही. या सर्वाचा परिणाम त्याच्या कुटुंबावर होत असतो. आज देशातील शेतकºयांची अवस्था काय आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. देशातील सर्वाधिक जनता ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्या कृषिक्षेत्राच्या दारुण स्थितीला महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे सरकारची कृषिविषयक धोरणे. शेती करायचे म्हटले की, नांगरणी, फवारणी, मशागत ही आलीच, वेगवेगळ्या प्रकारची खते ही शेतीसाठी खूप आवश्यक असतात. शेतीतून जर भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल, तर सेंद्रीय खते आणि रासायनिक खते यांशिवाय पर्याय नाही. जर का पिकाला योग्य वेळी खते दिली, तर पिकातून आपण भरघोस उत्पन्न मिळवू शकतो.
म्हणूनच शेतीला खताशिवाय अजिबात पर्याय नाही. रब्बी हंगामाची सुरुवात झाली, वाढत्या महागाईमुळे सर्वांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे खतांचे सुद्धा भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यंदाच्या वर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. उत्पन्न कमी मिळाल्यामुळे शेतकरी देखील अडचणीत आला आहे. रब्बी हंगामाची सुरुवात झाली असून, बरोबर हंगामाच्या सुरुवातीलाच रासायनिक खतांचा भाव हा वाढलेला आहे. त्यामुळे या वाढत्या महागाईमुळे शेतकरी राजा त्रस्त झाला आहे. रब्बी हंगामात १८.४६ या रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो, परंतु कच्च्या मालाच्या भाव वाढीमुळे रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झालेली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे खतांच्या किमतीत वाढ झाल्याचे इफकोने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता शेतकºयांना महागडी खते देऊन रब्बीची पेरणी करावी लागत आहे. त्यातच शेतकºयांची मानसिकता अशी आहे की १८.४६ हे एकच खत असे आहे, जे पिकाला चांगले उत्पादन देते. या मानसिकतेचा फायदा खत विक्रेते घेत आहेत. कृत्रिम टंचाई निर्माण करून या खताची चढ्या दराने विक्री केली जाते. तथापि १८.४६ हे खत सहजासहजी उपलब्ध नसले, तरी शेतकºयांकडे १०:२६:२६, १२:३२:१६, १५:१५, २०:२०:०० चा पर्याय आहे.
याशिवाय मिश्र खते, सेंद्रीय खते देऊनही चांगले उत्पादन मिळणे शक्य आहे, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. खरेतर निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्याच्या ऐवजी ऐन रब्बी हंगामाच्या सुरुवातीला खतांच्या किमतीत वाढ करून बळी राजाला संकटात टाकले आहे. यावर सरकारमध्ये बसलेल्या मंडळींनी आता विचार करण्याची गरज आहे.
े बाळासाहेब हांडे े/ ९५९४४४५२२२
2 comments
Pingback: บ้านมือสอง
Pingback: Where can i buy Methadone