खंडणीखोर, वसुली सरकार तुम्हाला येथे हवे आहे का – फडणवीसांचा घणाघात

दादरा नगर-हवेली – खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनाच मैदानात उतरवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भाजप उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर दादरा नगर-हवेलीमध्ये पोटनिवडणूक प्रलंबित होती. ही निवडणूक आता होत असून, त्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. कलाबेन डेलकर यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांवेळी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. ते मोदींचे नाव घेऊन निवडून आले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बसले. हे लोक फक्त संधीसाधू आहेत. जेव्हा त्यांना निवडणुका लढायच्या असतात, तेव्हा मोदींची आठवण येते आणि निवडणुका झाल्यावर त्यांना सत्ता दिसू लागते. शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचे राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला. ते येथे आले तर नाव महाराष्ट्राचे घेतील आणि काम मुघलांचे करतील, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …