ठळक बातम्या

क्रीडा … ॲशेस मालिकेला आजपासून सुरुवात


कर्णधार कमिन्सच्या नेतृत्वाची परीक्षा * इंग्लंड ११ वर्षांपूर्वीच्या पुनरावृत्तीच्या प्रयत्नात

ब्रिस्बेन – क्रिकेट विश्वातील सर्वात प्रतिष्ठेच्या ॲशेस मालिकेला बुधवारपासून ब्रिस्बेन येथे प्रांरभ होत आहे. यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ जलदगती गोलंदाज आणि नवखा कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली मालिकेचे विजेतेपद कायम ठेवण्याच्या इराद्यानेमैदानात पाऊल टाकेल, तर ११ वर्षांपूर्वीच्या उल्लेखनिय कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा जो रूटच्या संघाचा प्रयत्नात असेल.
ही ऐतिहासिक कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही संघाला झटके बसले आहेत. वर्णद्वेषाच्या आरोपाचा सामना करत इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला तर यजमान संघाचा कर्णधाराला आपल्याच सहकारी खेळाडूला अश्लिल संदेश पाठवण्याच्या आरोपामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवाय अनिश्चित कालावधीसाठी संघातून बाहेर पडला आहे.याशिवाय खराब हवामानामुळेउभय संघाला फारसा सरावही करता आलेला नाहीग़त काळातील कटूआठवणी मागेसारून मालिकेवर नाव कोरण्यासाठी आजपासून मैदानात उतरणार आहेत.१९५६ नंतर पहिल्यांदा कमिन्सच्या रू पात ऑस्ट्रेलियाला वेगवान गोलंदाजांचे नेतृत्व मिळाले आहे.४५ एकदिवसीय आणि ३८ टी-२० सामने खेळलेल्या कॅरीला निवड समितीनेमाजी यष्टीरक्षक पेनचा वारसदार म्हणून निवडले आहे. ऑस्ट्रेलियन संघात तीन जलदगती गोलंदाज तर एक फिरकीपटूचा समावेश असेल.यात मिशेल स्टार्क,जोश हेजलवूड , कर्णधार कमिन्स हेजलदगती त्रिकूट आणि नॅथन लियोन हा एकमेव फिरकीपटूअसेल, तरकॅमेरून ग्रीनकडे अष्टपैलू म्हणून पाहिलेजात आहे.टी-२० विश्वचषकातील अनुभवाचा डावखुरा डेव्हिड वॉर्नर कसोटी मालिकेत पुनरावृत्ती करेल, अशी अपेक्षा चाहतेबाळगून आहे.मधल्या फळीची जबाबदारी मार्नस लाबुशेन आणि अनुभवी स्टीव स्मिथच्या खांद्यावर आहे.त्याच्या दिमतीला ट्रेविस हेड आहे. रविवारीच ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे.
दुसरीकडे, इंग्लंडने २०१०-११ मध्येअंतिम ॲशेस कसोटी मालिका ३-१ ने नावानेकेली होती.जेम्स अँडरनस आणि स्टुअर्टब्रॉड त्या मालिकेचे भाग होते, मात्रअँडरसनच्या अनुपरिस्थितीत स्टुअर्टब्रॉड, मार्कवूड, क्रिस वोक्स आणि ओली रॉबिन्सन यांच्याकडेवेगवान गोलंदाजची धूरा असेल.रोरी बर्न्सचे सलामीवीर म्हणून नाव निश्चित आहे.रूट भारता विरोधात अखेरीची कसोटी मालिका खेळला होता.तीन शतक आणि एका अर्धशतक त्याने या मालिकेत झळकावले होते.त्यानेकामगिरीत सातत्य राखल्यास ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरू शकले.ओली पोप व डाम बेस ही फिरकीची जोडगळी ऑस्ट्रेलियातील वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर कसे प्रदर्शन घडवते हे पाहणे उत्सुकेचेअसेल.

* अँडरसनला विश्रांती
अ­ॅशेस मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार गोलंदाज जेम्स अँडरसन पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अँडरसन पूर्णपणे तंदुरुस्त आहे. 5 सामन्यांची मालिका पाहता आणि कामाचा ताण पाहता व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. जेम्स अँडरसनचे कसोटीतील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने आतापर्यंत १६६ सामन्यात ६३२ विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा इंग्लंडचा गोलंदाज आहे. अँडरसनचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने ३२ कसोटी सामन्यांच्या ५९ डावात १०४ बळी टिपले आहेत. ५ वेळा ५ विकेट्स आणि एकदा १० विकेट घेतल्या. अशा स्थितीत अँडरसनला न खेळवणे ऑस्ट्रेलियासाठीही दिलासादायक आहे. मात्र अष्टपैलू बेन स्टोक्स या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. याचा फायदा इंग्लंड संघाला होणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …