कोलंबो : टी-२० विश्वचषकासाठी श्रीलंकन निवड समितीन या आधी १५ खेळाडूंची नावे जाहीर केली होती. मात्र आता यात बदल करण्यात आला असून खेळाडूंच्या यादीत चार बदल करण्यात आले आहेत. श्रीलंकेचे लहिरू मदुशंका, नुवान प्रदीप यांच्यासह प्रवीण जयाविक्रमा आणि कामिंदू मेंडिस यांना दुखापत झाली असल्याने त्यांच्यावर संघाबाहेर जाण्याची वेळ आली आहे. आता या चौघांच्या जागी पथुम निसंका, अकिला धनंजय, लहिरू कुमारा आणि बिनुरा फर्नांडो यांची निवड करण्यात आली आहे. अकिला याची आजवरची कामगिरी पाहून त्याला संघात स्थान देण्यात आले आहे, तर दुसरीकडे कामिंदू मेंडिसला संघाबाहेर ठेण्यात आले असून त्याच्या जागी पथुम निसंकाची निवड केली गेली आहे. तर वेगवान गोलंदाज मदुशंका आणि प्रदीप यांना दुखापतीमुळे आराम देण्यात आला आहे.
दुखापतग्रस्त असलेल्या लहिरू मदुशंका आणि नुवान प्रदीप यांच्यासोबत प्रवीण जयाविक्रमा आणि कामिंदू मेंडिस यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जागी पथुम निसंका, अकिला धनंजय, लहिरू कुमारा आणि बिनुरा फर्नांडो यांना स्थान देण्यात आले आहे.
टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ संघात स्थान मिळवण्यासाठी श्रीलंका संघाला पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. १८ ऑक्टोबरला नामीबिया संघाविरुद्ध पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. त्यानंतर २० आणि २२ ऑक्टोबर रोजी क्रमश: आयर्लंड आणि नेदरलँडविरुद्ध त्यांचा सामना होणार आहे.
* असा आहे श्रीलंका संघ
दसून शनका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, कुसल परेरा, चरिथ असलंका, दिनेश चांदीमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजापक्षा, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ना, दुश्मांता चमीरा, महीश थिक्षना, लहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, अकिला धनंजय, पथुम निसंका यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.