क्रीडा …ज्युनियर हॉकी विश्वचषक: जर्मनी उपांत्य फेरीत

भुवनेश्वर – एफआयएच ज्यूनियर पुरूष हॉकी विश्वचषकावर सहा वेळा नाव कोरणाऱ्या जर्मनी पुरुष संघानेशूटआउटमध्ये स्पेनचा ३-१ असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
जर्मनी आणि स्पेन यांच्यातील सामना निर्धारित वेळेनुसार स्कोअर २-२ बरोबरीत सुटला होता. या सामन्यात पाचव्या मिनिटाला ख्रिस्तोफर क्युटरने पेनल्टी स्ट्रोकच्या जोरावर जर्मनीला आघाडी मिळवून दिली. मात्र यानंतर सहा मिनिटांनी स्पेनच्या इग्नासिओ अबाजोनेपेनल्टी कॉर्नरवर गोल करून बरोबरी साधली. पुढील दोन क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. यांनतर स्पेनने ५९ व्या मिनिटाला एडुआर्ड डी इग्नासिओ सिमोच्या गोलने आघाडी घेतली. सामना संपण्याची शिट्टी वाजतानाच जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ज्यावर मासी फँटने गोल करत सामना बरोबरीत सोडला. यामुळे निकाला शूटआऊटमध्ये गेला. शूटआऊटमध्ये जर्मनीकडून पॉल स्मिथ, मायकेल स्ट्रॅथोफ आणि हॅनेस म्युलर यांनी गोल केले, तर मॅटिओ पोझारिच गोल करण्यात अपयशी ठरला. दुसरीकडे स्पेनच्या अगाजो, गुलेर्मो फोरचुनो आणि सिमोचे यांना गोल करण्यात अपयश आले. जेरार्ड क्लॅप्सने गोल केले. यामुळे हा समाना ३-१ ने जिंकून जर्मनीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्युनियर विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या जर्मनीने आतापर्यंत सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी शेवटचे विजेतेपद २०१३ मध्ये दिल्लीत जिंकले होते. २०१६ मध्ये लखनौमध्ये त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …