प्राईम व्हिडीओने आपल्या आगामी क्राइम ड्रामा ‘अक्कड बक्कड रफू चक्कर’च्या टिझरचे नुकतेच अनावरण केले असून, याचे दिग्दर्शन दिवंगत राज कौशल यांनी केले आहे. अमन खान लिखित, ही वेब सीरिज राज कौशल यांचे शेवटचे डायरेक्टोरियल वेंचर असून ३ नोव्हेंबर २०२१ ला जगभरातील २४० देशांमध्ये प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. विक्की अरोरा यात मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत अनुज रामपाल, स्वाति सेमवाल, मोहन अगाशे, शिशीर शर्मा आणि मनीष चौधरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
दर्शकांना एका संभावित परंतु रोमांचक घोटाळ्याच्या रोलर कोस्टरमध्ये बसवून हा टिझर तुम्हाला उत्साहित करेल. टिझरमध्ये भार्गव शर्मा (विक्की अरोरा) आणि त्याचा मित्र भारत पहिल्यांदा नकली बँक उघडण्याची योजना बनवतात आणि लोकांना त्यात पैसे जमा करायला सांगतात आणि ते या पैशांसोबत पळून जातात. दर्शकांना विचार करायला भाग पाडतो.