कोहलीला मिळाली तबरेज शम्सीची साथ

मुंबई – विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या क र्णधार पदावरून हटवण्यात आले आहे. या प्रकरणाचे पडसाद अद्याप उमटत आहेत. विराटने बुधवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्याच्यात आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात एकवाक्यता नव्हती. भारतीय क्रिकेटमधील विसंवाद त्या दिवशी जग जाहीर झाला. विराटच्या पत्रकार परिषदेनंतर क्रिकेट विश्वात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी विराटवर टीका केली आहे, तर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूने विराटला पाठिंबा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर तबरेज शम्सी याने या प्रकरणात विराटला पाठिंबा दिला आहे. शम्सीने एका क्रिकेट फॅ नच्या ट्विटचा दाखला देत विराटची बाजू घेतली आहे. सौरव गांगुलीने सांगितलेल्या गोष्टीला दुजोरा देणे हा विराटसाठी सुरक्षित पर्याय होता, पण विराट मैदानात असो किंवा मैदानाच्या बाहेर त्या प्रकारचा व्यक्ती नाही, असे ट्विट एका फॅनने केले आहे. शम्सीने ते रिट्विट करीत, याच कारणामुळे तो इतका चांगला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …