ठळक बातम्या

‘कोस्टल’चा वाद चिघळला

  •  स्थायी समितीत रणकंदन
  • भाजपने प्रस्ताव मंजूर करण्याचा डाव उधळला

मुंबई – भाजप नेते आशिष शेलार यांनी मंगळवारी कोस्टल रोड प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्याचे पडसाद बुधवारी स्थायी समितीत पाहण्यास मिळाले. भाजपने कोस्टल रोडच्या मुद्यावरून सरकारला जोरदार धारेवर धरले. यावेळी स्थायी समितीत ८४० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार होती, मात्र हे प्रस्ताव घाईघाईत आणले असून, त्यात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप करत भाजपने हे प्रस्ताव मंजूर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उधळून लावला.

सत्ताधारी शिवसेनेने बुधवारी स्थायी समितीत तब्बल ८४० कोटींचे प्रस्ताव आणले होते, मात्र सत्ताधाऱ्यांचा हा डाव भाजपने उधळून लावला. या विविध प्रस्तावांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी केला. तसेच या प्रस्तावावर बोलूच न दिल्याने भाजपच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभेत शेवटपर्यंत तीव्र विरोध केला. सदर प्रस्तावात एका कोविड सेंटरसाठी ११ कोटींचे भाडे कश्यासाठी?, असा सवाल करत भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. स्थायी समितीच्या एकाचवेळी ८४० कोटींचे प्रस्ताव आले असताना यावर चर्चा होऊ न देणे हे लोकशाही प्रक्रियेसाठी घातक आहे. यामध्ये शिवसेनेचा भ्रष्टाचार असून, त्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होईल म्हणून भाजपच्या सदस्यांना चर्चेपासून प्रतिबंध करण्यात आले. यातून सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे. बहुतेक विषय स्थायी समितीत विचारात घ्यायचे नाही आणि शेवटच्या दिवशी घाईघाईत मंजूर करायचे हा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. एका कोविडच्या भाड्यापोटी ११ कोटी देत असू तर नवीन कोविड सेंटर आपण स्वत: का उभारले नाही?, असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. यापूर्वी सागरी किनारा मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर भाजपने आवाज उठवला आहे. यात कन्सल्टंटला २१५ कोटी रुपये देण्यावर, तसेच कंत्राटदाराला कोणतेही काम न करता १४२ कोटी रुपये देण्यावर खुद्द कॅगने ताशेरे ओढले आहेत. हा शिवसेनेचा भ्रष्टाचार असून, १० वर्षे होऊनही आजही किनारा मार्गाचे काम अपूर्ण आहे. यात ६५० कोटींचा संशयास्पद गैरव्यवहार झाल्याचा आरोप कॅगने केला आहे. याची उत्तरे सत्ताधाऱ्यांनी द्यावीत. केवळ भ्रष्टाचार लपवण्यासाठी विरोधकांना बोलू द्यायचे नाही, या स्थायी समिती अध्यक्षांच्या कृत्याचा भाजप धिक्कार करत आहे, अशी तीव्र प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment

  1. Pingback: hawaiian runtz