‘कोव्हिशील्ड’चे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये ७ महिन्यांनंतरही आढळल्या ९० टक्के अँटिबॉडिज

नवी दिल्ली – कोरोना विरोधी कोव्हिशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतल्याच्या तीन ते सात महिन्यांनंतरही ५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना विषाणू विरोधात उच्च प्रमाणात अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत. संशोधनानुसार लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांमध्ये ९० टक्के अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत. त्यामुळे एक मोठा दिलासा मिळाला आहे. पुणेस्थित बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाने जारी केलेल्या अहवालातून संपूर्ण माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एकूण लोकसंख्येपैकी बहुतांश जणांनी अद्याप कोरोना विरोधी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे अशांना बुस्टर डोस देणे योग्य ठरणार नाही, असेही अहवालातून समोर आले आहे.

कोव्हिशील्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या एकूण ५५८ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या केलेल्या चाचणीत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्यांच्यात अँटिबॉडीचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून आले आहे. कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यात आल्यानंतर लस घेतलेल्यांमध्ये अँटिबॉडी टिकून राहण्याचा कालावधीदेखील वाढला आहे, असे डॉ. तांबे यांनी सांगितले. कोव्हिशील्ड लसीचे लसीकरण पूर्ण केलेल्यांमध्ये तीन महिन्यांनंतर ९६.७७ टक्के अँटिबॉडी आढळून आल्या आहेत, तर सात महिन्यांनंतर याचे प्रमाण ९१.८९ टक्के इतके आढळून आले आहे. दरम्यान, नुकतेच दिल्लीत करण्यात आलेल्या सहव्या सीरो सर्व्हेतही सहभागी झालेल्यांपैकी ९० टक्के नागरिकांमध्ये कोरोना विरोधी अँटिबॉडी आढळून आल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …