ठळक बातम्या

कोव्हिशील्डचा बुस्टर डोस ओमिक्रॉनपासून संरक्षण करणार?

ब्रिटन – कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. हा नवा व्हेरिएंट जलद गतीने लोकांना संक्रमित करत असल्याचे समजले आहे. यानंतर आता इम्युनिटी वाढवण्यासाठी बुस्टर डोस देण्याची मागणी केली जात आहे. अशातच यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने सांगितले की, कोविड-१९ लसीचा तिसरा म्हणजेच बुस्टर डोस ओमिक्रॉन प्रकाराच्या लक्षणात्मक संसर्गापासून ७०-७५ टक्के संरक्षण देऊ शकतो.

हेल्थ एजन्सीच्या माहितीप्रमाणे, भारतातील कोव्हिशील्ड नावाने वापरली जाणारी आॅक्सफोर्ड/एस्ट्राजेनेका आणि फायझर/बायोएंडटेकच्या लसीच्या दोन्ही डोस कोविडच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉनविरुद्ध कमी सुरक्षा देतात. दरम्यान लसीचा तिसरा म्हणजेच बुस्टर डोस व्हेरिएंटविरोधात इम्युनिटी बुस्ट करतो, हा दावा संक्रमित प्रकरणांमधील डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहे. उक्साच्या सांगण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल न झाल्यास या महिन्याच्या अखेरीस ब्रिटनमध्ये संसर्गाची प्रकरणे १० लाखांच्या पुढे जातील, असा अंदाज आहे. प्राथमिक डेटाने असे लक्षात आले आहे की, बुस्टर डोस नवीन व्हेरिएंटविरुद्ध ७०-७५ टक्के संरक्षण देऊ शकतो. हे आकडे पूर्णपणे नवीन असले, तरी त्यामुळे अंदाजात बदल होण्याची शक्यता आहे.

उक्सामधील लसीकरण प्रमुख डॉ. मेरी रामसे म्हणाल्या, एकंदरीत दुसºया डोसनंतर काही दिवसांनी, डेल्टा प्रकाराच्या तुलनेत ओमिक्रॉनचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. आम्हाला आशा आहे की, कोविड-१९च्या गंभीर लक्षणांवर ही लस चांगला परिणाम देईल. जर तुम्ही अद्याप लसीचा पहिला डोस घेतला नसेल, तर ती लवकरात लवकर घ्या, असेही त्या म्हणाल्या.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …