‘कोव्हिशिल्ड’ लस घेतलेल्यांना ओमिक्रॉनचा धोका कमी – संशोधन

लंडन – ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्यामध्ये एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटवर कोणती लस अधिक प्रभावी आहे, याबाबत ब्रिटनमध्ये एक संशोधन करण्यात आले आहे. या प्रभावी लसींच्या यादीमध्ये भारतीय बनावटीच्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचाही समावेश आहे. जगभरात ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता ब्रिटनमध्ये एक संशोधन करण्यात आले. या संशोधनात जगभरातील सात कंपन्यांच्या लसींचा बुस्टर डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये अधिक प्रतिकारक क्षमता निर्माण झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. या सात लसींमध्ये ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा समावेश आहे. ही लस ऑक्­सफर्ड-ॲस्ट्राजेनेका या कंपनीने तयार केली आहे. भारतामध्ये कोविड लसीकरणात ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा वापर सर्वात जास्त झाल्यामुळे भारतीयांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
ब्रिटनमध्ये कोव्हिशिल्ड किंवा फायझरची कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींवर संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात लसीचे दोन डोस दिल्यानंतर बुस्टर डोस देऊन निरीक्षण करण्यात आले. याआधीच्या संशोधनात असे सिद्ध झाले होते की, ‘कोव्हिशिल्ड’ आणि फायजरची लस व्यक्तींमध्ये लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही सहा महिन्यांपर्यंत प्रतिकारक क्षमता वाढवण्यात प्रभावी आहे. अनेक लसनिर्मिती कंपन्या लसीचा बुस्टर डोस देण्याची मागणी करीत आहेत. दरम्यान, लस घेतल्यानंतर काही काळानुसार लसीचा प्रभावीपणा कमी होतो, असेही संशोधनात समोर आले आहे. लसीचा तिसरा डोस म्हणजेच बुस्टर डोस कोरोनावर किती प्रभावी आहे? याबाबत अद्याप जास्त संशोधन झालेले नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …