कोव्हिशिल्डच्या बुस्टर मात्रेला मंजुरी द्या – सीरम

नवी दिल्ली – कोव्हिशिल्डला बुस्टर मात्रेच्या रूपात परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कोरोना लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाने भारतीय औषध महानियंत्रकांकडे (डीजीसीआय) केली आहे. तिसºया मात्रेच्या रूपात कोव्हिशिल्डचा वापर करण्यासाठी कंपनीने मंजुरी मागितली आहे.

देशात सध्या कोव्हिशिल्डच्या मात्रा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी याच्या बुस्टर मात्रेला मंजुरी मिळावी, अशी मागणी सीरमने केली आहे. कोरोनाचा सामना करणाºया अनेक देशांनी बुस्टर मात्रेला मंजुरी दिली आहे. भविष्यात कोरोना विषाणूचे अनेक म्युटेशन समोर येतील, अशा परिस्थितीत भारतीयांना कोरोना लसीच्या दुसºया मात्रेसोबतच बुस्टर मात्रेचीही गरज आहे, असे मत अनेक तज्ज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …