लंडन – एवर्टन संघात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्यामुळे प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धे (ईपीएल)मध्ये बर्नलेविरुद्ध होणारा त्यांचा सामना स्थगित करण्यात आला. प्रीमिअर लीगने ही माहिती दिली. बॉक्सिंग डेला होणारा हा तिसरा सामना आहे, जो स्थगित करावा लागला. दरम्यान, रविवारी सहा सामने खेळवले जातील. सध्याचा चॅम्पियन व लीगमध्ये अव्वल स्थानी असलेला मँचेस्टर सिटी व लिस्टर यांच्यात होणारा सामनादेखील या सहा सामन्यांत समाविष्ट आहे. प्रीमिअर लीगमध्ये अद्यापपर्यंत कोरोनानुळे तब्बल १३ सामने स्थगित करण्यात आलेत. लीड्स व वॉटफोर्डच्या संघात कोविड-१९चे रुग्ण आढळल्याने अनुक्रमे लीव्हरपूल व वॉल्वरहॅम्पटनविरुद्ध रविवारी होणारा सामना स्थगित करावा लागलेला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …