कोविड लस घेतल्यामुळे मुलगी बनली करोडपती

कोरोना लस ही लोकांच्या सुरक्षिततेसाठी दिली जाते, तरीही ती खरोखरच त्यांच्या फायद्याची आहे, हे त्यांना पटवून देण्यास सरकारला भरपूर मेहनत घ्यावी लागते. लसीकरणासाठी सरकारकडून लोकांना लसीकरणाच्या बदल्यात आकर्षक आॅफरही दिल्या जात आहेत. अशाच एका आॅफरचा फायदा घेत आॅस्ट्रेलियाची जोआन झू ही लस घेतल्यामुळे करोडपती बनली आहे.
मिलियन डॉलर वॅक्स मोहिमेंतर्गत जोआन झू हिला हे बक्षीस मिळाले आहे. या आॅफरद्वारे आॅस्ट्रेलियातील ३ दशलक्ष लोकांना लस घेण्याच्या बदल्यात जॅकपॉट जिंकण्याची संधी देण्यात आली होती. जोआनला स्वत:ला माहीत नव्हते की, लसीकरणामुळे ती रातोरातकरोडपती होईल. हे सगळे तिच्याकरिता एका स्वप्नासारखे होते.

२५ वर्षीय जोआन झू ही आॅस्ट्रेलियातील सर्वसामान्य नागरिकांपैकी एक होती, तिने कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी केली होती. डेली स्टारच्या वृत्तानुसार, ‘द मिलियन डॉलर वॅक्स कॅम्पेन’ सध्या आॅस्ट्रेलियामध्ये सुरू आहे, ज्यामध्ये जोआन झूने स्वत:ची नोंदणी केली होती. सरकारी लसीकरण मोहिमेंतर्गत तिने लसीकरण केले आणि लकी ड्रॉमध्ये तिला सुमारे ७.४ कोटींची लॉटरी लागली.
सरकारी लकी ड्रॉमध्ये सुमारे ३० लाख लोकांनी सहभाग घेतला होता, मात्र तिच्या नशिबात करोडोंची लॉटरी लागणार आहे, याची जोआनला अजिबात कल्पना नव्हती. तिने लॉटरीसाठी पहिला कॉलदेखील उचलला नाही, नंतर तिला कळले की, तिने जॅकपॉट जिंकला आहे. केवळ आॅस्ट्रेलियन सरकारनेच नाही, तर सामाजिक कार्यकर्ते आणि सेवाभावी संस्थांनी मिळून लॉटरीचे पैसे दिले आहेत. आॅस्ट्रेलियातील कोरोना लसीकरण मोहिमेत या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …