ओमिक्रॉनचे १२७० रुग्ण!
२२० रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली – कोरोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी आणि ओमिक्रॉनला वेळीच आवर घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध शुक्रवारी जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर देश पातळीवर देखील निर्बंध घातले जाण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशातदेखील गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढीस लागली आहे. शुक्रवारी सकाळी केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या २४ तासांत एकूण १६ हजार ७६४ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे देशातला ओमिक्रॉन बाधितांचा आकडा आता १२७० झाला आहे.
देशभरात २३ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सध्या असल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. सध्या असलेल्या अॅक्टिव्ह ओमिक्रॉन बाधितांचा आकडा १२७० असून, त्यात सर्वाधिक ४५० ओमिक्रॉन बाधित हे महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल ३२० दिल्लीत, १०९ केरळमध्ये तर ९७ बाधित गुजरातमध्ये आहेत.
केंद्रीय आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत २२० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. व्यापक लसीकरणामुळे कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याचे स्वरूप गंभीर आजारात रुपांतरित होण्याचे प्रमाण घटल्याचे दिसून येत असले, तरी पुन्हा वेगाने वाढणारे बाधित आणि ओमिक्रॉनचा प्रसार चिंता वाढवणारा ठरत आहे. गुरुवारी दिवसभरात देशात ७ हजार ५८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे भारताचा रिकव्हरी रेट हा ९८.३६ टक्के इतका आहे, तर सध्या देशात ९१ हजार ३६१ अॅक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण आहेत.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …