कोरोना चाचणीसाठी २४ तास बुथ उभारा

  • केंद्राचा राज्यांना आदेश

नवी दिल्ली – देशात कोविड-१९च्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना विविध ठिकाणी कोरोना चाचणीसाठी २४ तास बुथ उभारण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने राज्यांना या बुथवर कोविड-१९ साठी २४ तास रॅपिड अँटिजेन टेस्ट सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. आरोग्य कर्मचाऱ्­यांना लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वदेशी बनावटीच्या चाचणी किट वापरण्यास प्रोत्साहित केले आहे.
राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्च (आयसीएमआर)चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला ताप, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, श्वास घेण्यास अडचण, शरीरात वेदना, चव किंवा वास कमी होणे, थकवा आणि जुलाब होत असल्यास त्याला कोविड-१९ चे संशयित रुग्ण मानले पाहिजे. केंद्रीय आरोग्य सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक यांनी पत्रात म्हटले आहे की, सर्व संशयित व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे. तपासाचा अहवाल येईपर्यंत, अशा लोकांनी ताबडतोब स्वत:ला विलगीकरणात ठेवावे आणि आरोग्य मंत्रालयाच्या संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. दरम्यान, महाराष्ट्र आणि प्रामुख्याने मुंबईत रुग्णवाढीचा वेग कमालीचा वाढलेला पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र लिहिले आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात राज्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण दोन लाखांच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यांनी धोक्याचा इशारा देत म्हटले आहे की, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका नाही. ओमिक्रॉन सौम्य आहे असे समजू नका. लसीकरण न झालेल्या आणि इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांसाठी ओमिक्रॉन जीवघेणा ठरू शकतो.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …