ठळक बातम्या

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांनाही कल्याण योजनांचा लाभ

मुंबई – कोविड-१९ मुळे निधन पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ देण्याचे आदेश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. त्यानुसार गरजू कामगार पाल्यांनी मंडळाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे. मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाऱ्या नोंदीत आस्थापनांतील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मंडळातर्फे विविध आर्थिक लाभाच्या योजनांसह कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने इयत्ता दहावी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या कामगार पाल्यांसाठी रु. दोन हजार ते रु. पाच हजार शिष्यवृत्ती, परदेशात उच्च शिक्षणासाठी रु. ५० हजार शिष्यवृत्ती, राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक खेळात प्रथम/द्वितीय/तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या कामगार व कामगार पाल्यांना रु. दोन हजार ते रु. १५ हजार शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक खरेदी किमतीच्या ५० टक्के रक्कम रु. दीड हजार ते रु. अडीच हजारपर्यंत अर्थसहाय्य, एम.एस.सीआयटी अभ्यासक्रम शुल्काच्या ५० टक्के रक्कम अर्थसहाय्य, गंभीर आजार उपचारासाठी रु. पाच हजार ते रु. २५ हजार अर्थसहाय्य, कामगार लेखकांना स्वलिखीत पुस्तक प्रकाशनासाठी रु. १० हजार अर्थसहाय्य, शिवणमशीन खरेदीसाठी ९० टक्के अर्थसहाय्य, १० वी १२ वी परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत कामगार पाल्यांचा गौरव आदी योजनांचा समावेश आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …