कोरोनामुळे दिल्ली हाय अलर्टवर

  •  सर्व खासगी कार्यालयांसह हॉटेल्स, बार बंद ठेवण्याचे आदेश

नवी दिल्ली – देशात कोरोनाची तिसरी लाट धडकली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज झपाट्याने वाढ होत असताना, राजधानी दिल्ली मात्र कोरोनामुळे हाय अलर्टवर आहे. दिल्लीत सोमवारी दिवसभरात २२ हजार ७५१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मंगळवारपासून सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्यासह कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
खासगी कार्यालये बंद ठेवून सर्व कर्मचाऱ्यांनी घरातून काम करण्याच्या सूचना दिल्लीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने दिल्या आहेत. ५० टक्क्यांच्या क्षमतांसह आतापर्यंत दिल्लीत सर्व खासगी कार्यालये चालत होती, परंतु वाढत्या कोरोनामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. दिल्लीतील सर्व हॉटेल आणि बारही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेलमधून फक्त होम डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याआधी दिल्लीत नाइट कर्फ्यूसह विकेंड कर्फ्यूही लावण्यात आला होता. तरीही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. त्यामुळे सरकारने आता खबरदारीचे उपाय म्हणून सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत कोरोना वाढीचा दर २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रत्येक चार लोकांमागे एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत आहे. २०२१च्या मे महिन्यात दिल्लीतील दरापेक्षा हा दर जास्त आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …