कोरोनामुळे एकाचा मृत्यू; पण सरकारी मदतीसाठी कुटुंबातील चौघांचा अर्ज

  • औरंगाबादमधील धक्कादायक घटना

औरंगाबाद – कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृताच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० हजार रुपये मदत म्हणून दिले जाते, परंतु या मदतीसाठी एका मृत व्यक्तीच्या कुटुंबातील चार सदस्यांनी वेगवेगळे अर्ज केल्याचे समोर आले आहे. ५० हजारांच्या मदतीसाठी मृताचा मुलगा, मुलगी आणि दोन भावांनी स्वतंत्र अर्ज केले आहेत. त्यामुळे कोणाचा अर्ज ग्राह्य धरून मदत करायची हा प्रश्न पालिकेसमोर पडला आहे.
कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपये मदत म्हणून दिले जातात. ही रक्कम मिळवण्यासाठी मृताच्या कुटुंबाने कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर माहितीची खातरजमा करून मृताच्या कुटुंबाला ५० हजार रुपये मिळतात. परंतु, औरंगाबादमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मुलगा, मुलगी आणि दोन भावांनी स्वतंत्र अर्ज केले आहेत. त्यामुळे पालिकाही संभ्रमात पडली आहे. दरम्यान, या चौघांनी अशाप्रकारे स्वतंत्र अर्ज का? केलेत, याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान, औरंगाबादमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार ९८० जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु, ५० हजार रुपयांच्या सरकारी मदतीसाठी तब्बल ५ हजार ३४० अर्ज पालिकेकडे दाखल झाले आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तींपेक्षा ३६६० जास्तीचे अर्ज आल्यामुळे ५० हजारांच्या सरकारी मदतीसाठी कुणाचा अर्ज ग्राह्य धरायचा, असा प्रश्न पालिकेला पडला आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …