ठळक बातम्या

कोरोनाने अब्जाधीशांना आणखी श्रीमंत केले!

नवी दिल्ली – गेल्या दोन वर्षांत कोविड-१९ (कोरोना) महामारीने जागतिक अर्थव्यवस्थेला खूप मोठा फटका बसला आहे. लाखो लोक बेरोजगार झाले, व्यवसाय उद्ध्वस्त झाले. प्रत्येक शहरातील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद झाल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या एक-दोन महिन्यांपासून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत होती. अशातच गेल्या महिन्याच्या अखेरीस कोविड-१९च्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने अशा प्रकारे दार ठोठावले की, जग पुन्हा एकदा हादरले आहे. याचदरम्यान झालेल्या एका अभ्यासात मात्र धक्कादायक निरीक्षण समोर आले आहे. या महामारी काळात जगातील सर्व अब्जाधीशांच्या उत्पन्नात काहीच फरक पडला नसून उलट त्यांच्या उत्पन्नात आणखी वाढ झाल्याचे समोर आले आहे.
या अभ्यासानुसार, जागतिक विषमता विषयक नवीन अहवालानुसार, कोविड काळात श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आहेत आणि जगात नवीन करोडपतीही जन्माला आले आहेत. हा अहवाल सामाजिक शास्त्रज्ञांच्या नेटवर्कने संयुक्तपणे तयार केला आहे, ज्यांनी अब्जाधीशांचे उत्पन्न आणि मालमत्ता याबद्दल हे मूल्यांकन केले आहे.
या अंदाजानुसार, यावर्षी अब्जाधीशांनी जागतिक देशांतर्गत संपत्तीपैकी ३.५ टक्के हिस्सा व्यापला आहे. २०२०च्या सुरुवातीच्या दोन टक्क्यांपेक्षा तो फक्त थोडा वेगळा होता. या संदर्भात प्रमुख लेखक लुकास चॅन्सेल म्हणाले की, कोविड संकटामुळे खूप श्रीमंत आणि उर्वरित लोकसंख्येमधील असमानतेची दरी वाढली आहे. या अहवालात असेही आढळून आले आहे की, इतरत्र श्रीमंत अर्थव्यवस्थांनी वेगाने वाढणारी गरिबी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीचा वापर केला. या अहवालाचे अग्रलेख नोबेल पारितोषिक विजेते ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी आणि एस्थर डुफ्लो यांनी लिहिले आहेत.
दोन्ही अर्थशास्त्रज्ञांनी लिहिले आहे की, संपत्ती हा भविष्यातील आर्थिक लाभ, शक्ती आणि प्रभावाचा एक मोठा स्रोत आहे. त्यांनी अत्यंत श्रीमंत लोकांच्या हातात आर्थिक शक्तीचे अमर्याद केंद्रीकरण यावर प्रकार टाकला आहे. या तपासणीमध्ये विविध प्रकारच्या वर्तमान अभ्यासांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासात असेही दिसून आले आहे की, कमकुवत कल्याण क्षेत्र असलेल्या देशांमध्ये गरिबी वाढली आहे, तर अमेरिका आणि युरोपमधील विकसित राष्ट्रांमध्ये कमी उत्पन्न असलेल्या लोकांवर याचा प्रभाव जाणवला नाही. म्हणजेच श्रीमंत देशांमध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढली नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …