कोरोनानंतर विनामास्कमध्ये फिरू लागलेली नोरा झाली ट्रोल

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या डान्सिंग मूव्हजद्वारे स्वत:ची खास ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या नोरा फतेहीचा अलीकडेच कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर नोरा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली खरी, परंतु तिच्या येण्याने चाहते आश्चर्यचकीत तर झालेच, परंतु त्यांनी तिला ट्रोल करायलाही सुरुवात केली. त्यावेळचा नोरोचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओत नोरा अतिशय साध्या भारतीय लूकमध्ये दिसून येते आहे. त्यावेळी तिने लाइट निळ्या रंगाचा सिल्कचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची पँट घातलेली होती. तिचे हे अतिाय साधे रूप चाहत्यांना चांगलेच आवडले आहे, परंतु कोविडच्या संक्रमणातून बरे झाल्यानंतरही नोराने मास्क न लावलेला पाहून यूझर्स चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे तिला त्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे लोक तिच्या रूपाचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे तिला ट्रोल करत मास्क न लावण्याविषयी विचारणाही करत आहेत. नोरा ही ३० डिसेंबर २०२१ रोजी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. पॉझिटिव्ह होताच तिने स्वत:ला आयसोलेटेड केले होते व कोविड पॉझिटिव्ह होण्याची माहिती नोराने स्वत: चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …