कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या धोक्यात भारत ‘ए’समोर दक्षिण आफ्रिका ‘ए’चे आव्हान

ब्लोमफोंटेन – कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटच्या धोक्यात भारत ‘ए’ संघ मंगळवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीत दक्षिण आफ्रिका ‘ए’विरुद्ध खेळणार आहे, तेव्हा सीनिअर संघात जागा बनवण्यासाठी प्रयत्नशील असलेले आपली छाप पाडू शकतील. पहिली चार दिवसीय कसोटी मागील आठवड्यात खराब वातावरणामुळे ड्रॉ राहिली. या काळात कोरोनाच्या नवा व्हेरिएंट ओमिक्रोनमुळे अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेवर प्रवास निर्बंध घातलेत. त्याचमुळे नेदरलंडने जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या अखेरच्या दोन वनडे न खेळण्याचा निर्णय घेतला. भारत ‘ए’ संघदरम्यान बायो बबलमध्ये थांबून आहे. सामना प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येत आहे. भारताचा सीनिअर संघदेखील ९ डिसेंबरला येथे सात आठवड्यांच्या दौऱ्यावर येत आहे. दरम्यान, परिस्थिती बिघडल्यास हा दौरा रद्द होऊ शकतो, ज्यात तीन कसोटी, तीन वनडे व चार टी-२० सामने खेळवले जातील. भारत ‘ए’ चे खेळाडू या महामारीबाबत विचार करण्याऐवजी संपूर्ण फोकस क्रिकेटवर ठेवतील. पहिल्या सामन्यात फलंदाजांनी चांगली कामगिरी केली व अभिमन्यू ईश्वरनने शतक ठोकले, तर कर्णधार प्रियांक पांचालने ९६ धावा केल्या, ज्याच्या मदतीने भारताने दक्षिण आफ्रिकेला ५०९ धावांवर आपला डाव घोषित केला. त्याचा पाठलाग करताना त्यांनी चार बाद ३०८ धावा केल्या. अखेरच्या दिवशी पावसामुळे सामना होऊ शकला नाही. सलामी फलंदाज पृथ्वी शॉने ४८ धावा केल्या व तो पुन्हा एकदा चांगली खेळी करू पाहील. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी संघात निवड न झालेला हनुमा विहारी २५ धावांच करू शकला. आता तो लय प्राप्त करू पाहील. भारतासाठी गोलंदाजी चिंतेची बाब आहे, कारण यजमान संघाने खूप धावा रचल्या. नवदीप सैनी व अर्जुन नागवासवालाला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या, तर उमरान मलिक एकच विकेट मिळवू शकला. फिरकीपटूंमध्ये राहुल चाहरने १२५ धावा देत एक विकेट मिळवला, पण के. गौतम व बाबा अपराजित अपयशी राहिले. यजमानांसाठी पीटर पालन (१६३) व टोनी डे जोर्जी (११७) यांनी शतक झळकावले, तर जे. स्मिथ, एस. केशिले व जॉर्ज लिंडेने अर्धशतक झळकावले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …