कोरोनाची तिसरी लाट कदाचित ओमिक्रॉनच्या रूपात – राजेश टोपे

मुंबई – देशात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडल्याने सामान्य लोकांमध्ये आता पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. कदाचित पुढच्या काळात कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉनची असू शकेल, पण त्यामुळे घाबरण्याचे कारण नसून, ओमिक्रॉन हा धोकादायक नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
ओमिक्रॉनमुळे संसर्गाची भीती वाटतेय, मात्र घाबरण्याचे कारण नाही. यावर लगेच निर्बंधांची कारवाई करणे लोकांना जाचक आणि त्रासदायक होईल. त्यामुळे लगेच निर्बंधांची आवश्यकता नाही. लोकांनी आपल्या पातळीवर काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. कर्नाटकामध्ये आढळलेल्या दोन ओमिक्रॉन रुग्णांमुळे राज्यात सतर्कतेचे आवाहन करत राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि सर्वांनी लस घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. धोकादायक देशामधून येणाºया प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा अ‍ॅक्शन प्लॅन समोर आला आहे. मुंबईतील मॉल, रेस्टॉरंट, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक येथे लसीचे दोन डोस असणाºयांनाच प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. जर या ठिकाणी कोरोना लसीचे दोन डोस न घेतलेली व्यक्ती आढळल्यास संबंधित संस्थांना १० हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …