ठळक बातम्या

कोरोनाचा भारतीय हॉकी संघाला फटका: आशिया महिला चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर


डोंगे- आशिया महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी दक्षिण कोरियात गेलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. संघातील एका खेळाडूला कोरोना झाल्याचा फटका संपूर्ण भारतीय महिला संघाला बसला आहे. कोरोनाची लागन झाल्याच्या पार्श्वभूमिवर भारतीय संघाला द. कोरियात सुरू असलेल्या आशिया चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.मलेशियाच्या संघानेही कोरोनामुळेच माघार घेतली आहे. दोन अव्वल संघांच्या अनुपस्थितीत कोरियातील या स्पर्धेचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
कोरोनामुळे२०२० मध्य्ेही महिला आशिया चॅम्पियन्स स्पर्धारद्द करण्यात आली होती. वर्षभरानंतर स्पर्धा पुन्हा सुरू झाली आणि पहिलेसामनेनियोजित वेळापत्रकानुसार खेळवण्यात आले, पण भारतीय संघातील एका खेळाडूला कोरोनाचा संसर्ग झाल्याचेकळले आणि स्पर्धासंयोजकांना धक्का बसला. त्यामुळे सोमवारी भारत आणि मलेशियातील सामना ऐनवेळी रद्द करावा लागला होता. खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता स्पर्धा संयोजकांनी भारतालाच बाहेरचा रस्ता दाखवला. गतविजेता कोरिया आणि चीनचे या परिस्थितीत भारताविरोधातील सामनेही रद्द करण्यात आले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …