ठळक बातम्या

कोरोनाचा कहर, अमेरिका व आयर्लंडविरुद्धचा पहिला वनडे रद्द

फोर्ट लॉडरडेल (अमेरिका) – अमेरिका व आयर्लंड यांच्यात रविवारी खेळवला जाणारा पहिला वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना अम्पायरिंग चमूत कोविड-१९चा रुग्ण आढळल्याने रद्द करावा लागला. अमेरिका क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका क्रिकेट व क्रिकेट आयर्लंड हे आयसीसीसोबत एकत्रितपणे कार्य काय राखेल, जेणेकरून हे निश्चित करता येईल की, मालिकेतील इतर सामने पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार खेळवता येतील. त्यात सांगण्यात आले की, एक अम्पायरला कोविड-१९ची लागण झाली आहे, पण ज्या तिघांना सामन्यात अम्पायरिंग करायची होती, ते त्यांच्या संपर्कात आल्याने कोणीही सामन्यासाठी अम्पायरिंगला उपलब्ध नव्हते. दुसरा वनडे मंगळवारी आणि तिसरा सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे. त्याआधी दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …