कोरोनाचा उद्रेक; रशियात लॉकडाऊन

मॉस्को – कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. जग या संकटातून काहीसे सावरत असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. चीननंतर आता रशियाच्या राजधानीतदेखील लॉकडाऊन करण्यात आला आहे. रशियामध्ये गेल्या २४ तासांत ४० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. ही महामारी सुरू झाल्यापासूनची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्याचबरोबर ११५९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुतीन सरकारने मॉस्कोमध्ये ११ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारपासून (२८ आॅक्टोबर) रशियामधील शाळा, महाविद्यालये, मॉल्स, रेस्टॉरंट आणि बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले की, रशियाच्या ८५ प्रदेशांमध्ये जेथे परिस्थिती विशेषत: गंभीर आहे, तेथे आधी काम थांबविले जाऊ शकते आणि सुट्ट्या ७ नोव्हेंबरच्या पुढे वाढवल्या जाऊ शकतात. या काळात बहुतेक सरकारी संस्था आणि खाजगी व्यवसायांना देखील काम थांबवावे लागेल, मुख्य पायाभूत सुविधा आणि काही इतरांना वगळता.
कोरोनामुळे चीनदेखील पुन्हा चर्चेत आला आहे. चीनमध्ये मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे चीनसोबतच संपूर्ण जगाच्या सरकारांनी आणि प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून चीनने कठोर पावले उचलायला सुरुवात केली असून, आता तर एका अख्ख्या शहरातच चीनने लॉकडाऊन लागू केला आहे. चीनच्या लँझो शहरामध्ये जवळपास ४० लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे, पण अशा शहरामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याचे समोर आल्यानंतर चीनने एक मोठा निर्णय घेतला. या संपूर्ण शहरात चीनने कठोर लॉकडाऊन लागू केला. जर फारच आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडण्याचे नागरिकांना आदेश देण्यात आले आहेत.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …