ठळक बातम्या

कै. एकनाथ साटम ज्येष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्काराने अनेक मान्यवर सन्मानित

मुंबई – मुंबई खोखो संघटनेची द्वैवार्षिक सर्वसाधारण सभा लाल मैदान परळ येथे नुकतीच पार पडली. संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार लाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पूर्ण झाली. या सभेत दोन वर्षांचे अहवाल आणि हिशिबपत्रके मंजूर करण्यात आली.

यावेळी लाड यांच्या हस्ते एकनाथ साटम ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार हा २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन वर्षांकरता ६ जणांना देण्यात आला. पुरस्कार विजेत्यांचा शाल-श्रीफळ, रुपये ५ हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्राचे ज्येष्ठ राष्ट्रीय पंच प्रशिक्षक प्रभाकर वाईरकर, वैभव स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक वैजनाथ श्रीधर वैद्य त्याचप्रमाणे ज्येष्ठ सांखिक तज्ज्ञ आणि अमर हिंद मंडळाचे पदाधिकारी अरुण अनंत देशपांडे या सर्वांचा सन २०१९-२० साठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, तर पुष्पराज मोहन बागायत्कर ज्येष्ठ पंच प्रशिक्षक त्याच बरोबर विजय क्लबचे आताचे कार्यवाह आणि संघटनेचे माजी खजिनदार यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्यासोबत अनिल मोरेश्वर टिकारे विद्यार्थी क्रीडा केंद्राचे राज्यस्तरीय खेळाडू आणि संघटनेचे माजी पदाधिकारी आणि सागर भूमी या संस्थेचे संस्थापक भालचंद्र सोमदत्त चांदोरकर ज्यांनी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहिले होते या सर्वांचा २०२०-२१ या सालासाठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …