के. एल. राहुलसाठी लखनऊ मोजणार मोठी रक्कम?

नवी दिल्ली – आयपीएलच्या २०२२ पर्वासाठी नवे संघ अहमदाबाद व लखनऊ फ्रँचायझींनी त्यांची संघबांधणी सुरू केली आहे. के. एल. राहुलने पंजाब किंग्जकडून न खेळण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे नवीन फ्रँचायझी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असून, लखनऊ मोठी रक्कम मोजण्यास तयार असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबने जर लोकेशला रिलीज केले, तर लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. बीसीसीआयच्या नियमानुसार नव्याने दाखल झालेल्या दोन फ्रँचायझींना अन्य ८ फ्रँचायझींनी रिलीज केलेल्या खेळाडूंपैकी प्रत्येकी ३ खेळाडूंना मेगा ऑक्शनपूर्वी करारबद्ध करता येणार आहे. त्यामुळे लोकेश लखनऊ फ्रँचायझीकडून खेळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. लखनऊ फ्रँचायझीने लोकेशला २० कोटींहून अधिक रक्कम देण्याची ऑफर दिली असल्याचे वृत्त काही इंग्रजी वृत्तस्थळांनी दिले आहे. भारतीय टी-२० संघाच्या उपकर्णधाराला पंजाब किंग्जने ११ कोटींत ताफ्यात घेतले होते. त्यामुळे त्याला ९ कोटींची भरघोस वाढ मिळण्याचे वृत्त आहे. बीसीसीआयच्या रिटेन नियमानुसार जर पंजाब किंग्जने त्याला कायम राखण्याचा निर्णय घेतला, तर त्याला जास्तीत जास्त १६ कोटी मिळू शकतात. आयपीएल २०१८ पासून लोकेशने आयपीएलच्या चार पर्वात अनुक्रमे ६५९, ५९३, ६७० व ६२६ धावा केल्या आहेत. संजिव गोएंगा यांच्या आरपीएसजी ग्रुपने ७०९० कोटी रुपयांची बोली लावून लखनऊ फ्रँचायझी खरेदी केली. लखनऊ फ्रँचायझीने आदिल राशिदलाही १६ कोटींची ऑफर दिल्याचे वृत्त आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …