घर खरेदी करणे हे अनेक लोकांसाठी स्वप्नासारखे असते. आयुष्यभराची कमाई गुंतवूनही अनेकांना घर घेता येत नाही. अनेक लोकांकडे साधनसामग्री असली, तरी घर घेण्याची इच्छा नसते. अनेकवेळा तरुणांच्या नशिबात घर घेणे शक्य होत नसले, तरी एका ६ वर्षांच्या मुलीने भाऊ आणि बहिणीसह स्वत:चे घर घेतले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, मुलीने केवळ पॉकेटमनी वापरून घर विकत घेतले आहे.
आॅस्ट्रेलियात राहणारा ३६ वर्षीय कॅम मॅक्लेलन हा एक मोठा प्रॉपर्टी डिलर आहे. कोरोनापासून, मेलबर्नच्या बाहेरील घरांच्या किमती खूप स्वस्त झाल्या आहेत, परंतु कॅमचा अंदाज आहे की, कालांतराने त्या वेगाने वाढतील. त्यामुळे कॅमने आपल्या तीन मुलांना मालमत्ता विकत घेण्यासाठी राजी केले. मात्र, त्यांनी स्वत: संपूर्ण पैसे खर्च केले नाहीत. त्यापेक्षा मुलांना स्वत: पैसे कमवण्याची जबाबदारी कळावी म्हणून त्यांना पॉकेटमनी साठवण्याची कल्पना दिली.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कॅमने मुलांना घरातील कामात गुंतवून घेतले आणि त्या कामांच्या बदल्यात त्यांना पैसे दिले. मुलांनीही त्याला त्याची पुस्तके पॅक करण्यास मदत केली, त्यानंतर त्याने सुमारे ४.५ लाख रुपये जमा केले. नंतर कॅमने स्वत: उरलेले पैसे खर्च करून मुलांच्या नावावर मालमत्ता खरेदी केली. येत्या १० वर्षांत मुलांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या ज्या घराची किंमत ५ कोटी रुपये आहे, ते येत्या १० वर्षांत १० कोटींहून अधिक होईल, असे ते म्हणाले.
कॅम हे प्रॉपर्टी कंपनी ओपन कॉर्पचे संचालक आणि सह-संस्थापक आहेत. यासोबतच त्यांनी मालमत्तेतील गुंतवणुकीवर ‘माय फोर इयर ओल्ड, द प्रॉपर्टी इन्व्हेस्टर’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. हे पुस्तक गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झाले होते. एका वर्षात हे पुस्तक बेस्ट सेलर ठरले आहे.
2 comments
Pingback: www.blackhatlinks.com
Pingback: จํา นํา โฉนด ที่ดิน กับ ร้านทอง