ठळक बातम्या

केक बनवताना घडला भीषण अपघात

अपघात कधीही कोणासोबतही होऊ शकतो. अनेकवेळा असे अपघात नकळत घडतात, ज्याचा परिणाम खूप भयावह असतो. अशीच एक घटना स्कॉटलंडमधून समोर आली आहे, जिथे आईसोबत खेळायला गेलेल्या ५ वर्षीय मुलीला आयुष्यभर वेदना सहन कराव्या लागल्या. महिला तिच्या स्वयंपाकघरात केक बनवत होती. यासाठी तयार केलेले द्रावण ही महिला इलेक्ट्रिक बीटरने फेटत असताना, अचानक मुलीचे केस त्यात अडकले. यानंतर, महिलेने मुलीचे केस काढण्याआधीच तिच्या कपाळाचा मोठा भाग केसांसह उपटून आला.
येथील वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी स्कॉटलंडमधील आयरशायरमध्ये राहते. घटनेच्या वेळी ती तिच्या आजीच्या घरी होती, जिथे तिची आई केक बनवत होती. मुलीने खाली वाकून ते पाहण्याचा प्रयत्न करताच तिचे केस इलेक्ट्रिक बीटरमध्ये अडकले. त्यामुळे तिच्या डोक्याच्या पुढचा मोठा भाग केसांसह बाहेर आला. ही संपूर्ण घटना काही सेकंदात घडली. मुलीच्या आईने लगेच बीटर बंद केले; पण तोपर्यंत तिचे केस टाळूसह बाहेर आले होते.

या घटनेबाबत बोलताना मुलीची आई रडू लागली. तिने सांगितले की, लहानपणी ती आईसोबत केक बनवायची; पण आपल्याच मुलीसोबत अशी घटना घडेल असे कधी वाटले नव्हते. रक्ताने माखलेल्या डोळ्यांसमोर आपल्या मुलीला किंचाळताना पाहून तिचे हृदय थरथर कापत होते. मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी मुलीच्या आईच्या समजुतीचे कौतुक करत वेळीच बीटर बंद न केल्यास अपघात अधिक भीषण होऊ झाला असता, असे सांगितले.
अपघातानंतर मुलीनेही खूप शौर्य दाखवले. त्रास होत असतानाही ती डॉक्टरांशी खूप चांगली वागली. उपचारादरम्यान तिने पूर्ण सहकार्य केले. आता मुलीची प्रकृती बरी आहे. तिच्या कपाळाच्या एका भागातून केस गेले आहेत, ज्यांचे पुढे प्रत्यारोपण करण्याचे नियोजन आहे. सध्या ती मुलगी तिच्या जखमेतून सावरत आहे. काही काळानंतर तिच्या जखमा भरून आल्यावर तेथे प्रत्यारोपणाच्या माध्यमातून केस वाढतील, अशी अपेक्षा आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …