नवी दिल्ली – आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्जने त्यांचा कर्णधार केएल राहुलला संघमुक्त केले आहे. पंजाब किंग्जने मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंगला कायम ठेवले आहे. दिग्गज लेग-स्पिनर आणि पंजाब किंग्जचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मंगळवारी याबाबत खुलासा केला आहे. ‘फँचायझी केएल राहुलला त्यांच्यासोबत ठेवू इच्छित होते, पण केएल राहुलने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो आणि तो त्याचा अधिकार आहे, असे अनिल कुंबळे यांनी म्हटले.
आयपीएलच्या १५ व्या हंगामाच्या मेगा लिलावात राहुलचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, केएल राहुल आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी लखनऊच्या नव्या टीमचे नेतृत्व करू शकतो. दोन नवीन आयपीएल फ्रँचायझींकडे लिलावापूर्वी तीन खेळाडूंची निवड करण्याचा पर्याय आहे.
पंजाब किंग्जमध्ये सामील झाल्यानंतर राहुलने जोरदार फटकेबाजी केली. गेल्या चार हंगामात त्याने ६५९, ५९३, ६७० आणि ६२६ धावा केल्या. राहुलने आयपीएल २०२० मध्ये ऑरेंज कॅपही जिंकली होती. मात्र, केएल राहुल कर्णधार म्हणून फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या दोन हंगामात पंजाबला लीग स्टेजच्या पुढे नेऊ शकला नाही. पंजाब किंग्जने २०१४ पासून एकही प्लेऑफ सामना खेळलेला नाही. पंजाबने मयंक अग्रवालला १२ कोटी रुपयांना रिटेन केले. त्याचवेळी अनकॅप्ड अर्शदीप सिंगला ४ कोटींसाठी कायम ठेवण्यात आले. कोणत्याही अनकॅप्ड खेळाडूला ४ कोटी रुपयांपर्यंत अनकॅप केले जाऊ शकते. मयंक अग्रवालला पंजाबचा संघ आयपीएल २०२२ मध्ये कर्णधार बनवू शकतो.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …