कमाल आर खान अर्थात केआरके हा अतिशय वेगळ्या पद्धतीने चित्रपट रिव्ह्यू करण्यासाठी ओळखला जातो. अनेकदा त्याची भाषा लोकांना विचार करण्यास भागही पाडते आणि हेच कारण आहे की तो अनेकदा कायदेशीर अडचणीत सापडला आहे. सध्या त्याचा एक सर्व्हे खूप चर्चेत आहे, जो त्याने चंढीगढ करे आशिकी या चित्रपटासंदर्भात केला आहे. या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना हा वाणी कपूर बरोबर दिसून येणार आहे. या चित्रपटाविषयी लिहिताना केआरकेने हा चित्रपट कोणत्याही पॉर्न फिल्मपेक्षा कमी नाही’ अशी टिप्पणी केली आहे.
केआरकेने लिहिले आहे,’ सर्व्हेवरुन लक्षात आले आहे की 35 टक्के हताश आणि ‘ठरकी’ लोक ही अश्लील (सॉफ्ट पॉर्न) चंडीगढ करे आशिकी पाहण्यास उत्सुक आहेत. याचाच अर्थ हा चित्रपट पहिल्या दिवशी 3-4 कोटीचा गल्ला जमवू शकेल. या चित्रपटाचे बजेट जवळपास 70 कोटींचे आहे.’ केआरकेने जेव्हापासून हे ट्वीट केले आहे तेव्हापासून हे ट्वीट चर्चेत आहे. केआरकेविषयी लोक सातत्याने कमेंट्स करताना दिसून येतायेत. आयुष्मानचा हा चित्रपट येत्या 10 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे. गेल्या काही काळापासून आयुष्मान सातत्याने एकसारखे चित्रपट करत आला आहे. परंतु यावेळेस मात्र त्याने काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे. आता अशा प्रकारचा आयुष्मान चाहत्यांच्या पसंतीस उतरेल का हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.