केंद्र सरकारने कोरोना निर्बंधात ३० नोव्हेंबरपर्यंत केली वाढ

नवी दिल्ली – देशभरात सण-उत्सवाचे वातावरण असून, दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे, बाजारातही गर्दी वाढत असून, सार्वजनिक ठिकाणी लोकांची वर्दळ दिसत आहे. सध्यातरी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असली, तरी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कोविड-१९च्या नियमावलींचे पालन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना आणि नागरिकांना दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोविडसंदर्भातील नियमावलींचे पालन करणे बंधनकारक असून, केंद्र सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत कोविडचे निर्बंध वाढवले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये केंद्र सरकारने २८ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून कोविडसंदर्भातील निर्बंधांचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, आरोग्य मंत्रालयाच्या २१ सप्टेंबर २०२१च्या आदेशाचे पालन यापुढेही करणे बंधनकारक असणार आहे. केंद्राचे सचिव अजय कुमार भाला यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक जारी करण्यात आले आहे. यापूर्वी २८ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून सरकारने ३० ऑक्टोबरपर्यंत कोविडचे निर्बंध वाढवले होते. आता, हे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आले आहेत. सरकारने कोविडसंदर्भातील निर्बंध कायम ठेवले असून, सार्वजनिक कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने यांनाही बंदीच असणार आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …