ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या चिंतेची
नवी दिल्ली – कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे काही राज्यांनी निर्बंध लावले असून, आता केंद्रानेही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने ओमिक्रॉन रुग्ण जास्त असणाºया तसेच लसीकरणाचा वेग कमी असणाºया राज्यांमध्ये पथके पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. १० राज्यांमध्ये या टीम पाठवण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. ज्या राज्यांमध्ये पथके पाठवणार आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रासोबत केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोरम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब या राज्यांचा समावेश आहे.
ही पथके कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, तसेच पाळत ठेवणे आणि प्रतिबंधात्मक कारवायांवर लक्ष ठेवणार आहेत. यासोबत कोरोना चाचणी, कोरोनासंबंधित नियमांचे पालन, त्यांची अंमलबजावणी, रुग्णालयांत उपलब्ध बेड्स यांची पाहणी करणार आहेत. रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर आणि मेडिकल आॅक्सिजन यांची उपलब्धता कितपत आहे, याचीही माहिती घेतली जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसीकरणाची प्रगती कशा पद्धतीने सुरू आहे याकडे लक्ष दिले जाईल. शनिवारी देशातील ओमिक्रॉन रुग्णसंख्येने ४०० चा टप्पा ओलांडला. सध्या देशात ओमिक्रॉनचे ४१५ रुग्ण आहेत. यामुळेच अनेक राज्यांनी निर्बंध जाहीर केले असून, नाईट कर्फ्यूचीही घोषणा करण्यात आली आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …