केंद्रीय निवडणूक आयोगाची सोमवारी महत्त्वाची बैठक

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता
नवी दिल्ली – सध्या देशातील कोरोना आणि ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र असतानाच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची बैठक येत्या सोमवारी (२७ डिसेंबर) होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोग मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचारसभा आणि रॅलींसाठी गर्दी होऊ शकते, त्यामुळे राजकीय पक्षांनी याबाबत विचार करावा, असा सल्ला दिल्याने निवडणुकांना ब्रेक लागणार का? याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पुढील वर्षात होणार आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांसोबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार आहे. वाढत्या ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही निवडणुकीबाबत ‘जान है तो जहान है’ असा सल्ला दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका लांबणीवर पडणार का हे पाहावे लागणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांवर ओमिक्रॉनचे संकट निर्माण झाले आहे. त्यातच अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या सल्ल्याने संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ओमिक्रॉन वाढत असल्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणुका टाळण्यासाठी सरकारने विचार करावा. निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचारसभा आणि रॅलींसाठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षांनी याबाबत विचार करावा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका जसा जगाला आहे, तसाच भारतालाही आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात न्या. शेखर कुमार यादव यांच्या खंडपीठासमोर एका जामिनाच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यावेळी कोर्टातील गर्दी पाहून न्यायालयाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे आवाहन केले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी निवडणूक रॅली आणि सभांवर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. मोदींनी निवडणुका तहकूब करण्याबाबतही विचार करावा, असे मतही नोंदवले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …