ठळक बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा रद्द

पुणे – गेले काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चर्चेत असलेला पुणे दौरा अखेर रद्द झाला आहे. यासंदर्भातील माहिती भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. दौरा रद्द होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे मुळीक यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. या दौऱ्याच्या निमित्ताने महापालिका निवडणुकांचा नारळ अमित शहा यांच्या हस्ते फोडला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्या दृष्टिकोनातून अमित शहा यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांचे आयोजनदेखील करण्यात आले होते. सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शहा पहिल्यांदाच पुणे भेटीवर येणार होते. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. ते वैकुंठ मेहता इन्स्टट्यिूटला भेट देणार होते. संविधान दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिकेच्या विस्तारीत नवीन इमारतीत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते करण्यात येणार होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …