ठळक बातम्या

 केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून ३१ डिसेंबरला मुंबईत हायअलर्ट; पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द

मुंबई – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी प्लॅन तयार केले आहेत, मात्र कोरोना निर्बंधांमुळे न्यू इअर पार्टीवर मर्यादा आल्या आहेत. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. मुंबईत कलम १४४ ही लागू करण्यात आलेले आहे, तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई कायम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते. आता ३१ डिसेंबरला दहशतवाद्यांकडून धोका असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली आहे. त्यामुळे मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक मालमत्तादेखील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकते. गुप्तचर विभागाच्या सूचनेनंतर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सामान्य लोकांनी घाबरू नये, तर सावधगिरी बाळगावी. घाबरून जाण्याची गरज नाही, प्रत्येकाने सावध रहावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त चैतन्य यांनी मुंबईकरांना केले आहे. ३१ डिसेंबरला कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अँटी सॅबटॉजची टीम, बीडीडीएस, गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ठाण्यांच्या एटीसीला देखील अलर्ट देण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …