केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र

ऑक्सिजन उपलब्धतेबाबत दिल्या सूचना

नवी दिल्ली – देशातील विविध राज्यांत झपाट्याने वाढणारा कोरोना संसर्ग पाहता केंद्र सरकारने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यास सांगितले आहे, तसेच आरोग्य सचिवांच्या वतीने देशातील सर्व कृत्रिम ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट योग्य पद्धतीने काम करत आहेत का?, याचीही खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.
आरोग्य सचिवांनी राज्यांना सूचना देत रुग्णालयांमध्ये ४८ तास ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खात्री करण्यास सांगितले आहे. यासोबतच सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स व्यवस्थित काम करत आहेत का, आयसीयू, बीआयपीएपी, एसपीओ २ प्रणालीसाठी आवश्यक व्हेंटिलेटर योग्य प्रकारे काम करत असल्याची खात्रीही करण्यास सांगण्यात आले. देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा सुमारे दोन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभाग ॲक्शन मोडमध्ये आले असून, संपूर्ण घडामोडींवर त्यांच्या वतीने लक्ष दिले जात आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …