आता दोन वर्षांसाठी करावे लागणार डेटाचे जतन
नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून दूरसंचार कंपन्यांच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार दूरसंचार कंपन्यांना आता आपल्याकडील डेटा आणि इंटनेट वापराबाबतची माहिती दोन वर्षांसाठी जतन करून ठेवावी लागणार आहे. दूरसंचार विभागाकडून दूरसंचार कंपन्यांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. पूर्वी हा सर्व डेटा जनत करून ठेवण्याचा कालावधी एक वर्षाचा होता. हा कालावधी वाढवण्यामागे सुरक्षेचे कारण सांगण्यात आले आहे.
दूरसंचार विभागाने जारी केलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, यापुढे दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्याकडे असलेला सर्व डेटा हा दोन वर्षांसाठी जतन करून ठेवावा लागणार आहे. या डेटामध्ये इंटरनेट वापराचा इतिहास, कॉल रेकॉर्ड्स, कॉल डिटेल्स, एक्स्चेंज डिटेल्स, सीम नंबर अशा सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे. पूर्वी याची मर्यादा एक वर्ष इतकी होती, मात्र आता ती वाढवून दोन वर्षे करण्यात आली आहे. दोन वर्षांनंतर जर दूरसंचार विभागाकडून कुठलेच आदेश मिळाले नाहीत, तर कंपन्या आपल्याकडील डेटा हा नष्ट करू शकतात.
नवे बदल जनतेच्या हितासाठी आणि सुरक्षेसाठी करण्यात आल्याचा दावा देखील दूरसंचार विभागाकडून करण्यात आला आहे. कंपन्यांना देण्यात आलेल्या नव्या आदेशानुसार कंपन्यांना त्यांच्याकडील सर्व माहितीचे जनत दोन वर्षांसाठी करावे लागणार आहे. ज्यामध्ये व्यक्तीच्या इंटरनेट वापराबाबतची माहिती, सर्व कॉल डिटेल्स, इंटनेट ॲक्सेस, व्यक्ती वापरत असलेल्या सर्व प्रकारच्या अॅप्लिकेशन्सची नोंद ठेवणे, तसेच त्यांच्या वापराबाबतचे डिटेल्स, बंद झालेल्या सीम सेवेबाबतची माहिती अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. हा डेटा स्टोर करण्याचा कालावधी वाढवल्यास सायबर गुन्हेगारीला आळा घालता येऊ शकतो, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …