मुंबई – भारतातील आयआयटी संस्थांमध्ये ‘कॅ म्पस प्लेसमेंट’ सुरू झाले आहे. कॅ म्पस प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना देशातील आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून मोठे पॅकेज देण्यात आलेय. आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याला उबर कंपनीकडून २.०५ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले गेले आहे. आयआटी रुरकीच्या विद्यार्थ्याला आंतरारष्ट्रीय टेक फर्मकडून २.१५ कोटी रुपयांचे पॅकेज दिले गेले आहे, तर आयआयटी गुवाहटीच्या विद्यार्थ्याला २ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे.
आयआयटी संस्थांमधील कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशीच गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या आणि पॅकेजेस विद्यार्थ्यांना देण्यात आली. गतवर्षी सर्वाधिक पॅकेजची रक्कम अमेरिकेतील आयटी फर्म कोहेस्टी यांनी १.५४ कोटी रुपये दिले होते. ते पॅकेजदेखील आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यालाच मिळाले होते. यंदाही आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याला उबरकडून २.०५ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे, तर भारतातील स्थानिक कंपन्यांकडून सर्वाधिक ६२ लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे.
आयआयटी रुरकीच्या ११ विद्यार्थ्यांना १ कोटी रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे, तर आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक जॉब मिळाले आहेत. आयआयटी मद्रासच्या १७६ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी निवड झाली आहे. यावर्षीच्या टॉप रिक्रूटर्समध्ये मायक्रोसॉफ्ट, क्वालकॉम, गुगल, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, एअरबस, ॲमेझॉन, ॲपल, एपीटी पोर्टफोलिओ, बजाज ऑटो लिमिटेड, उबर आणि रुब्रिक या कंपन्यांचा समावेश होता. उत्पादन अभियंता, संशोधन आणि विकास, सॉफ्टवेअर अभियंता, हार्डवेअर अभियंता, व्यवसाय विश्लेषक, आर्थिक विश्लेषक, विपणन विश्लेषक, पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, सल्लागार, उत्पादन व्यवस्थापन, डेटा सायन्स इत्यादी पदांवर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …