कॅरमच्या प्रचारासाठी कोलकाता-मुंबई तब्बल १३०० मैलांचा सायकल प्रवास

मुंबई – ११ नोव्हेंबर २०२१ रोजी सायकलने कोलकात्याहून मुंबईला निघालेल्या देबर मोंडल व अग्नी बाग या दोन युवकांनी मंगळवारी तब्बल ३५ दिवसांनी मुंबईला भेट दिली. कॅ रम या घराघरात खेळल्या जाणाऱ्या खेळाला अधिक लोकप्रियता व सर्व स्तरांवर मान्यता मिळावी हा या मागचा मूळ हेतू होता. ‘लव्ह कॅरम, प्ले कॅरम, जय कॅ रम’ हे ब्रीदवाक्य आपल्या सायकलवर लावून हे दोन युवक कोलकात्याहून छत्तीसगढ मार्गे महाराष्ट्रात आले. या प्रवासात त्यांना अनेक ठिकाणी कॅ रमपटूंनी व क्रीडा रसिकांनी शुभेच्छा दिल्या. कोलकात्यामध्ये आजही काही ठिकाणी चौकोनाच्या बाहेर पॉकेट असलेल्या मोठ्या कॅरम बोर्डवर उभे राहून खेळले जाते. ते चित्र बदलून अधिकृ त कॅरमकडे स्थानिक कॅरमपटूंनी वळावे यासाठी हे जनजागृती अभियान राबविल्याचे या दोन युवकांनी सांगितले. कॅ रम असोसिएशन ऑफ बेंगॉलने व विशेष करून त्यांचे सचिव सिमलाई यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियमांनुसार एका छत्रछायेखाली कॅरम खेळला जावा यासाठी त्यांनी १३०० मैलाचा हा प्रवास सायकलने केला. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, तर काही ठिकाणी त्यांना जंगलातूनही प्रवास करावा लागला. या धाडसी अभियानासाठी त्यांना टाटा कंपनीने सायकल पुरस्कृ त केली होती. तर भारतीय आयुर्विमा महामंडळ व कोलकात्याच्या कॉस्पो कॅरम कंपनीनेही त्यांना आर्थिक सहकार्य केले. प्रवासात येणाऱ्या विविध क्लबमधील व स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत व कॅरमबाबत माहिती गोळा करत त्यांनी १४ डिसेंबर २०२१ मुंबईत प्रवेश केला. विश्व विजेत्या कॅरमपटू प्रशांत मोरे व्यतिरिक्त राज्यातील दिग्गज कॅरम खेळाडंूसहित देशातल्या कॅरममधील अग्रगण्य महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला भेटण्याची त्यांची इच्छा होती. यासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने शिवाजी पार्क जिमखान्याच्या सहकार्याने शिवाजी पार्क जिमखाना येथे देबर मोंडल व अग्नी बाग यांच्या जंगी स्वागताचे आयोजन केले होते. सायंकाळी ५.३० वाजता शिवाजी पार्क जिमखान्यावर त्यांचे आगमन होताच उपस्थित कॅरमप्रेमींनी त्यांचे पुष्पगुच्छ व हार तुऱ्यानी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. स्वागत समारंभाच्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना या दोन्ही युवकांना अश्रू अनावर झाले. उपस्थितांनी त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. पुढील दोन दिवस ते मुंबईत राहून कॅ रमबाबतची अधिक माहिती गोळा करणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे उपाध्यक्ष अरुण केदार, धनंजय साठे, मानद सचिव यतिन ठाकूर, विश्व विजेता कॅरमपटू प्रशांत मोरे तर जिमखान्याचे सहसचिव सुनील रामचंद्रन व कार्यकारिणी सदस्य अजय पाटणकर हजर होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …