ठळक बातम्या

कुर्ला परिसरात २० वर्षीय तरुणीची बलात्कार करून हत्या

मुंबई – अवघ्या दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील शक्ती मिल कम्पाऊंड बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा न देता ती जन्मठेपेची करण्यात आली असतानाच मुंबई पुन्हा एकदा अशाच एका घटनेने हादरली आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये असलेल्या एचडीआयएल कम्पाऊंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. या तरुणीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
कुर्ला परिसरातील एचडीआयएल कम्पाऊंडमध्ये या तरुणीचा मृतदेह आढळून आला. कम्पाऊंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर हा मृतदेह सापडल्यानंतर तातडीने राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसून आसपासच्या पोलीस स्थानकांमध्ये बेपत्ता असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत का, याचीही खातरजमा पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण एचडीआयएल कम्पाऊंडमधील या बंद असलेल्या इमारतीवर इन्स्टाग्रामसाठी व्हिडीओ शूट करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना टेरेसवर तरुणीचा मृतदेह आढळून आला, त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …