ठळक बातम्या

कुबेरांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेडची मागणी

नाशिक – ‘रेनेसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली आहे. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर बंदी घालण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे. गिरीश कुबेर यांनी ‘रेनेसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. स्वत:च्या पुस्तकांमध्ये सोयराबाई महाराणी साहेब यांचा खून संभाजीराजांनी केला, अशा पद्धतीचे वादग्रस्त व संतापजनक लिखाण गिरीश कुबेर यांनी केले आहे. त्यांनाच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी साहित्य संमेलनातील एका परिसंवादाचे अध्यक्षपद दिले आहे. यापेक्षा बदनामीचे समर्थन दुसरे कुठलेही असू शकत नाही, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमची चाचपणी करत आहे. बाकीचे सगळे स्वयंघोषित पुरोगामी त्यांचे हस्तक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संभाजी ब्रिगेडसह सर्व शिवप्रेमींनी गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर बंदी घालावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून प्रचंड तक्रारी करून सुद्धा कुबेरांवर गुन्हा दाखल केला नाही. तरीही नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कुबेरांना परिसंवादाचे अध्यक्ष देणे निषेधार्ह आहे. कदाचित वादग्रस्त लिखाणाची ही शाब्बासकी असेल. हे असले साहित्य संमेलन नुसते रद्द करून चालणार नाही, तर ते बंद केले पाहिजे. त्यामुळेच कुबेर यांना काळे फासून संभाजी ब्रिगेडच्या शिवप्रेमींनी दिलेली ही वैचारिक प्रतिक्रिया आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …