सामान्यत: आपण कुत्र्याला असा प्राणी म्हणून ओळखतो, जो त्याच्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावतो. मात्र, जर्मनीतील एका जर्मन शेफर्डने असे काही केले नाही. जेव्हा त्याच्या मालकिणीवर दुसºयाने हल्ला केला, तेव्हा तो शांतपणे उभा राहिला. त्याने हल्लेखोराला घाबरवले नाही किंवा त्याच्या मालकिणीच्या सुरक्षिततेसाठी लढा दिला नाही.
ही घटना पूर्व जर्मनीतील आहे. येथे कुत्र्याला शिस्त शिकवण्यावरून दोन महिलांमध्ये वाद झाला आणि हे प्रकरण हाणामारीवर गेले. गंमत म्हणजे ज्या कुत्र्याबाबत दोन्ही महिलांमध्ये भांडण झाले, तो कुत्रा शांतपणे मारामारी पाहत राहिला. त्याने एकदाही दुसºया महिलेला आपल्या मालकिणीला मारत असूनही घाबरवले नाही.
घटना पूर्व जर्मनीतील थुरिंगिया भागातील आहे. येथे कुत्र्याला शिस्त लावण्याच्या नावाखाली २७ वर्षीय कुत्र्याची मालकीण आणि ५१ वर्षीय महिलेमध्ये भांडण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेने तरुणीच्या कुत्र्याला मारल्यामुळे दोन महिलांमध्ये भांडण झाले. भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दरम्यान, वृद्ध महिला जमिनीवर पडली असता, तिने कुत्र्याच्या मालकीणीच्या पायाला दाताने चावा घेतला आणि ती जखमी झाली. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जर्मन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा दोन महिलांमध्ये भांडण झाले आणि त्यांच्या मालकिणीला दुसºया महिलेने चावा घेतला, तेव्हा कुत्रा तिथे उपस्थित होता. तो भुंकला नाही किंवा वृद्ध महिलेला चावा घेऊन घाबरवण्याचा प्रयत्नही केला नाही. कुत्र्याची ही वृत्ती फारच विचित्र होती, कारण मालकीणीला अडचणीत पाहून कुत्रे सहसा अडचणीत येतात.