कुत्र्याच्या वाढदिवशी लायटिंग आणि ड्रोन शो पाहून लोक झाले थक्क!

पाळीव प्राणी मालकांचे नाते त्यांच्या पाळीव प्राण्यांशी इतके जोडलेले आहे की, त्यांना विशेष वाटण्यासाठी ते पाण्यासारखा पैसा ओतताना फारसा विचारही करत नाहीत. चीनमध्येही एका मालकाने आपल्या कुत्र्याचा वाढदिवस खास बनवण्यासाठी हसत हसत लाखो रुपये खर्च केले. मात्र, या सोहळ्याला जो कोणी आला होता त्याला तेथील प्रकार पाहून फार आश्चर्य वाटले.
या खास कुत्र्याचे नाव ऊङ्म४ ऊङ्म४??? असून तो चीनच्या हुनान प्रांतात आपल्या मालकिणसोबत राहतो. शिक्षिका तिच्या कुत्र्याशी इतकी जोडली गेली की तिने वाढदिवस साजरा करण्यासाठी ११ लाख रुपये जाळले. आता दोघींचा महागडा आणि खास वाढदिवस चर्चेत आहे.

येथील वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या ड्रोन शोसाठी कार्यक्रमासाठी ५२० ड्रोन देखील वापरण्यात आले. ‘ऊङ्म४ ऊङ्म४:??? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’ आणि ऊङ्म४ ऊङ्म४ ला १०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! लिहिले होते. वाढदिवस साजरा करण्यासाठी हा व्हिडीओ ळ्र‘ळङ्म‘ या चिनी प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना लोकांनी सांगितले की, त्यालाही पुढच्या जन्मात कुत्रा बनायचे आहे.
कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त कुत्र्याच्या मालकाने स्वत: सांताक्लॉजचा ड्रेस तयार केला होता. त्याचवेळी, या वाढदिवसाविषयी स्थानिक लोकांनी सांगितले की, त्यांनी लग्नात ड्रोन शो पाहिला होता, पण वाढदिवसा दिवशी पहिल्यांदाच पाहिला आहे. ड्रोनचा वापर सामान्यत: लग्नसमारंभात केला जातो. जेव्हा लोकांनी हे पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्यांना खूप विचित्र वाटले. ड्रोन रेंटल कंपनीच्या म्हणण्यानुसार, कुत्र्याच्या मालकाला त्याच्या वाढदिवसानिमित्त ३० मिनिटांचा ड्रोन शो हवा होता. यावेळी कुत्र्यांच्या आवाजात हॅपी बर्थडे गाणेही गायले गेले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …