अभिनेता सनी देओलने नुकतेच गदर 2 या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली आहे. अनिल शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटामध्ये सनी देओल पुन्हा एकदा अमिषा पटेल बरोबर दिसून येणार आहे व त्याचे शूटींग हिमाचल प्रदेशमध्ये सुरु करण्यात आले आहे. चित्रपटाच्या शूटींगच्या मुहुर्त शॉटचे फोटो नुकतेच सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. या चित्रपटासंदर्भात बोलताना सनीने आपल्या बॉलीवूड करीअरविषयीही भाष्य केले.
सनी देओल पुन्हा एकदा ॲक्टींग मध्ये ॲक्टीव्ह झालायं. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याने आर.बाल्की यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या चित्रपटाचे शूटींग पूजा भट्टसोबत पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने लागलीच गदर-2 च्या शूटींगलाही सुरुवात केली आहे. याशिवाय तो अपने 2 चे कामही लवकरच हाती घेणार आहे. यासंदर्भात बोलताना सनी म्हणाला,’ आता खूप काही होत आहे. लोक माझ्याविषयी खूप काही बोलत आहेत. परंतु मला अद्यापही चांगले चित्रपट मिळत नाहीयेत. अखेर किती वर्षे सिद्ध करायचेय की मी एक चांगला ॲक्टर आहे? गोष्टी खूप बदलल्या आहेत. मी ॲक्टींग सोडली होती. परंतु आता मला अक्षय कुमार व अजय देवगण प्रमाणे वर्षात तीन-चार चित्रपट करायचे आहेत. त्यापैकी एक तर चालेल. मी ठरवले आहे की मी वर्षातून पाच चित्रपट करेन आणि हेच माझे यश असेल. गेल्या 15 वर्षांमध्ये मी खूप कमी काम केले आहे. मी खूप वेळ वाया घालवला आहे. परंतु आता चांगले आणि अधिकाधिक चित्रपटांद्वारे मला माझे करीअर पुढे न्यायचे आहे. डिजीटल प्लॅटफॉर्म्सनेही कलाकारांसाठी मार्ग मोकळे केले आहेत.’
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …