किर्ती कुल्हारीची आता निर्मिती क्षेत्राकडे झेप

 

आपल्या कसदार अभिनयाने अल्पावधीतच स्वत:चा चाहता वर्ग निर्माण करण्यात यशस्वी ठरलेली किर्ती कुल्हारी हिने आता किंत्सुकुरॉय फिल्म्स या नावाने आता स्वत:चे प्रोडक्शन हाऊस लाँच केले आहे, ज्याचे पहिले प्रोजेक्ट एक डार्क कॉमेडी थ्रिलर नायिका आहे. यात किर्ती स्वत: अभिनय करतानाही दिसून येणार आहे. आपल्या प्रोडक्शन हाऊसचे नाव किर्तीने एका जपानी शब्दावरून ठेवले आहे, ज्याचा अर्थ सोन्याने जोडणे असा होतो.
यासंदर्भात किर्तीने सांगितले,’प्रोडक्शन हाऊस सुरू करणे माझे स्वप्न होते, ज्याकरिता गेल्या कित्येक वर्षांपासून प्लॅनिंग सुरू होते. एका कलाकाराच्या रूपात मागील तीन वर्षे खूप चांगली गेली, ज्यामुळे आपले फिल्म प्रोडक्शनचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रेरणेला अधिक बळ मिळाले. त्यामुळे मला आणखी एक पाऊल पुढे टाकायचे आहे, जेणेकरून मी लोकांना चांगल्या कंटेंटसह जगातील सर्वोत्कृष्ट कथा सांगू शकेन. या फिल्म प्रोडक्शनच्या प्रक्रियेत सर्वांना एक समान संधी देण्याबरोबरच एक कामाचे वातावरण तयार करण्याचा माझा हेतू आहे.

दरम्यान, प्रोडक्शन हाऊसच्या नावाचे महत्त्व सांगताना किर्ती म्हणाली, किंत्सुकुरॉय या जपानी शब्दाचा अर्थ होतो सोन्याबरोबर तुटलेले मातीचे भांडे जोडण्याची कला. या मागचा विचार असा आहे की, जेव्हा एखादी गोष्ट तुटते तेव्हा ती ठीक करण्यासाठी सोन्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे ती वस्तू किंवा गोष्ट आपल्या तुटलेल्या अवस्थेपेक्षाही अधिक सुंदर होऊन जाते. मलाही चित्रपटाच्या माध्यमातून तुटलेली मने आणि लोकांच्या आयुष्यातील रिक्तपणा पूर्णपणे बदलून टाकायचा आहे’.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …