किरकोळ कारणावरून मालेगावात रुग्णालयाची तोडफोड

नाशिक – मालेगावच्या सामान्य रुग्णालयात किरकोळ कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी राडा घालत तोडफोड केल्याचा गंभीर प्रकार रात्री उशिरा घडला आहे. मालेगावच्या सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी किरकोळ कारणावरून वाद घालत रुग्णालयाच्या साहित्याची तोडफोड केली आहे. तोडफोड करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या वृद्ध महिला रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना जास्त वेळ थांबू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने नातेवाईक असलेल्या एका तरुणाने सुरक्षा रक्षकासोबत वाद घालत धक्काबुकी केली. त्यानंतर रुग्णाचे १० ते १५ महिला व पुरुष नातेवाईकांनी रुग्णालयात येत राडा घालत, रुग्णालयातील खुर्च्या, कुंड्या व रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …