किमान २० चांगले चित्रपट मिळेपर्यंत नो ट्विटर – हर्षवर्धन राणे

सनम तेरी कसम फेम अभिनेता हर्षवर्धन राणे हा अलीकडेच हसीन दिलरुबा या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आला होता. या चित्रपटानंतर तरी हर्षवर्धनचे नशीब फळफळेल, अशी वेडी आशा त्याच्या चाहत्यांना होती, परंतु प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही. किंबहुना बॉलीवूडमध्ये चांगले प्रोजेक्ट न मिळवून आपण आपल्या तमाम चाहत्यांची घोर निराशा केली आहे, असे हर्षवर्धनला वाटत आहे.
आपल्या फिल्मी करिअरबद्दल बोलताना हर्षवर्धन म्हणाला, ‘कोणताही कलाकार हा आपल्या प्रत्येक चित्रपटाबरोबर प्रेक्षकांमध्ये पाच टक्क्याने अधिक ओळखला जातो. किंबहुना राष्ट्रीय ओळख प्राप्त करण्याच्या दृष्टीने चित्रपट हा मैलाचा दगड ठरतो. मला वाटते की, मला हर तऱ्हेच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी किमान २० हिंदी चित्रपट करण्याची गरज आहे.’ आपल्या करिअरवर अधिकाधिक फोकस करण्याकरिता आपण आपले ट्विटर अकाऊंट डिलीट केल्याचे हर्षवर्धनने अलीकडेच सांगितले होते. सध्या हर्षवर्धन लंडन येथे आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. जोपर्यंत आपण किमान २० चांगले चित्रपट करत नाही, तोपर्यंत आपण आपले ट्विटर अकाऊंट सुरू करणार नसल्याचे वा सोशल नेटवर्किंग साइट्सवर परत येणार नसल्याचे हर्षवर्धनने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, हसीन दिलरुबा हा तुझ्या करिअरकरिता गेम चेंजर ठरेल असे तुला वाटले होते का, असा प्रश्न करण्यात आला असता, हर्षवर्धन म्हणाला, कोणत्याही चित्रपटाला टर्निंग पॉइंट म्हणू शकेन इतका मी नक्कीच लकी नाहीये. जेव्हा मी प्रत्येक चित्रपट करतो तेव्हा मला केवळ एकच ऑफर येते अशी खंतही हर्षवर्धनने व्यक्त केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …