काही खेळाडू आयपीएलला अधिक प्राधान्य देतात – कपिल देव

नवी दिल्ली – पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला आपटले आणि त्यानंतर न्यूझीलंडने जोरदार दणका दिला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर माजी कणर्धार कपिल देव यांनी जोरदार टीका केली. तसेच काही खेळाडू राष्ट्रीय संघापेक्षा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य देत असल्याचेही कपिल देव म्हणाले.
आयपीएल २०२१च्या दुसºया टप्प्यानंतर भारतीय खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळायला हवा होता, असेही कपिल देव म्हणाले. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यानंही बायो बबलमुळे आलेल्या थकव्यावर मत व्यक्त केलं. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनीही अतिरिक्त कायर्भारामुळे खेळाडू दमल्याचे मान्य केले. ”जेव्हा खेळाडूच राष्ट्रीय कर्तव्य सोडून आयपीएलमध्ये खेळण्यास प्राधान्य देतात, तेव्हा आपण काहीच बोलू शकत नाही. देशाकडून खेळण्याची संधी मिळाल्याचा खेळाडूंनी अभिमान बाळगायला हवा. मला त्यांची आर्थिक परिस्थिती माहीत नाही, त्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही, ”असे कपिल देव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले,”मला असे वाटते की पहिलं देशाला महत्त्व दिले पाहिजे आणि नंतर फ्रँचायझींना. आयपीएलमध्ये खेळू नका, असे माझे म्हणणे नाही, परंतु आता भारतीय क्रिकेटच्या भलाईच्या दृष्टीनं बीसीसीआयनं नियोजन करायला हवं. झालेल्या चुकांतून शिकायला हवं. आता भविष्याचा विचार करायला हवा आणि त्यानुसार योग्य नियोजन व्हायला हवं. वर्ल्ड कप संपला म्हणजे भारतीय क्रिकेटही संपले, असं नाही. आयपीएल व वर्ल्ड कप यांच्यात पुरेसा कालावधी असायला हवा होता,

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …